बुधवारी आणि शुक्रवारी मुंबईत पंतप्रधानांचा दौरा; काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोदींना दाखवणार काळे झेंडे

महिला अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगून आहेत. त्यामुळे मोदींच्या 15 मे व 17 मे रोजीच्या मुंबई दौऱयात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार आहेत. भाजपने कितीही यंत्रणा लावली तरी महिला काँग्रेस नरेंद्र मोदींच्या विरोधात ताकदीने आंदोलन करून महिला अत्याचारावर जाब विचारण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी आज दिला.

टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अलका लांबा म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार करणाऱयांना भाजपने नेहमीच पाठीशी घातले आहे. त्यांच्यावर कारवाई केली नाही. महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपचा खासदार बृजभूषण सिंह याच्यावर कारवाई केली नाही. महिला काँग्रेसने आवाज उठवला व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला, पण अद्याप कारवाई शून्य आहे. भाजपने त्याच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द काढला नाही. पुलदीप सेंगरसारख्या बलात्कारी नेत्यांना भाजपने संरक्षण दिले आहे. यातूनच भाजपचे चरित्र कसे आहे हे स्पष्ट होते.

भाजपचा मित्रपक्ष जेडीएसचा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रज्वल रेवण्णाने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवण्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवण्णाचा भांडाफोड होताच त्याला हिंदुस्थानातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या अत्याचारी नराधमाला परदेशातून हिंदुस्थानात आणावे व कडक कारवाई करावी, अशी मागणी अलका लांबा यांनी यावेळी केली आहे.

देशभरात मोदी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. लोकांमध्ये भाजप सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दक्षिण हिंदुस्थान, उत्तर हिंदुस्थानसह सर्वच राज्यांत इंडिया आघाडीला अनुपूल वातावरण आहे.
– अलका लांबा,
अध्यक्षा अ. भा. महिला काँग्रेस