
अकराव्या ‘ब्रिक्स’ शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ब्राझिलला रवाना झाले. मोदी 2014 ला पहिल्यांदा ब्राझिलच्या फोर्टालेजा येथे झालेल्या ब्रिक्स शिखर संमलेनात सहभागी झाले होते. त्यानंतर मोदी सलग सहाव्यांदा ‘ब्रिक्स’ शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. ‘अभिनव भविष्य के लिए आर्थिक वृद्धि’ हा या संमेलनाचा यंदाचा विषय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी ब्राझिलची राजधानी ब्रासिलियाच्या दिशेने कूच केली. मोदींसोबत व्यापाऱ्यांचे मोठे प्रतिनिधिमंडळ ‘ब्रिक्स बिझनेस फोरम’मध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान, या शिखर संमेलनासाठी हिंदुस्थान, रशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि चीन या पाच देशांचे प्रतिनिधिमंडळ उपस्थित असणार आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi leaves for Brazil to attend the 11th BRICS summit. pic.twitter.com/uVm5Rjo4PS
— ANI (@ANI) November 12, 2019
पुतीन आणि शी झिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच मोदी ब्रिक्स बिझनेस फोरमच्या मुख्य सत्रात आणि समारोप सोहळ्यातही सहभागी होणार आहेत. संमेलनात जागतिक समस्यांवर आणि नव्या आर्थिक संधींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

























































