आधी श्रीमंत राष्ट्रांनी कार्बन उत्सर्जन कमी करावे -मोदी

श्रीमंत राष्ट्रांनी त्यांचे कार्बन उत्सर्जन 2050 च्या आधीच पूर्णपणे कमी करायलाच हवे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील हवामान परिषदेत (सीओपी28) केले. हवामान बदलांचा सामना करणाऱया विकसनशील आणि गरीब देशांना मदत करण्यासाठी एक कायमस्वरूपी वित्तीय चौकट जगाने निश्चित करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदी म्हणाले की, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा समतोल राखण्याचे उत्तम उदाहरण हिंदुस्थानने दाखवून दिले आहे. 17 टक्के लोकसंख्या असूनही कार्बन उत्सर्जनात आपला वाटा फक्त 4 टक्के आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी कमी करण्याचे आमचे लक्ष्य आहे.