मोदी बनले पायलट, ‘तेजस’मधून घेतली भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरूच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिली, जिथे त्यांनी हवाई दलाचे लढाऊ विमान ‘तेजस’ मधून उड्डाण केले.

आपला अनुभव ‘एक्स’वर शेअर करताना मोदी म्हणाले, ‘तेजसमधून यशस्वीरीत्या उड्डाण केले. हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा आणि आपल्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास वाढवणारा होता. मी अभिमानाने सांगू शकतो की, आपली मेहनत आणि दृढनिर्धारामुळे स्वयंपूर्णतेच्या बाबतीत जगातील कोणाहीपेक्षा आपण कमी नाही. देशाचे हवाई दल, डीआरडीओ आणि एचएएल यांच्याबरोबरच समस्त देशवासीयांचे हार्दिक अभिनंदन.’

मीम्सचा पाऊस… ढगात कुणाला हात दाखवतायत

मोदी यांच्या ‘तेजस’ भरारीचे पह्टो आणि व्हिडीओ पाहून नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला उधाण आले आहे. सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. मोदी ढगात कुणाला टाटा करत आहेत ? शक्तिमानला की सुपरमॅनला ? अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत. काहींनी मोदींच्या पह्टोशूटच्या सवयीवर टीकास्र सोडले आहे.