पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुष्पांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर तसेच मंगेशकर कुटुंबीयांनी आदरांजली वाहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार सुप्रिया सुळे, दिग्दर्शक मधुर भांडारकर, गीतकार-लेखक जावेद अख्तर, आमीर खान, रणबीर कपूर, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर महादेव देवळे, नगरसेविका श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच खासदार शरद पवार सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली.