
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच गुरुवार 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. कलम 370 मधील एक कलम वगळता अन्य कलम रद्द केल्यानंतर तसेच जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्यानंतर ते पहिल्यांदाच जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Prime Minister Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM today.
— PMO India (@PMOIndia) August 8, 2019
आज 8 तारीख आहे. महिना देखील ऑगस्ट म्हणजे आठवा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या आधी नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान मोदी यांनी जनतेला 8 नोव्हेंबर 2016 रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले होते. मात्र त्यावेळी ते कोणत्या विषयासंदर्भात बोलणार यांची माहिती देण्यात आली नव्हती. आज ही पंतप्रधान मोदी कोणत्या विषयावर बोलणार असे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र जम्मू-कश्मीरच्या संदर्भात आणखी काही विशेष माहिती देण्याची शक्यता आहे.























































