तुटवडा दूर करण्यासाठी कैद्यांमार्फत मास्कची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात मास्कची मागणी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काळ्याबाजारात मास्क विकण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे राज्यातल्या सर्व कारागृहांतील कैद्यांमार्फत मास्कची निर्मिती सुरू झाली आहे.

राज्यात अचानक मास्कची मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांद्वारे मास्कची निर्मिती करण्याची कल्पना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली. याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तत्काळ मास्कनिर्मितीला प्रारंभ केला. हे मास्क बनवून ते स्वतःही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. त्यातून कैद्यांना मिळणारा आर्थिक मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जात आहे.