पृथ्वी शॉचे कसोटी पुनरागमन; मयांक अग्रवालला वन डेत संधी

281

रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंडमधील वन डे व कसोटी मालिकांना मुकावे लागणार आहे. त्याच्याऐवजी वन डे मालिकेत मयांक अग्रवालला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली असून मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचेही हिंदुस्थानच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही कसोटीच्या संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्यांदाच त्याला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

हिंदुस्थान-न्यूझीलंडमध्ये आजपासून वन डे मालिकेचा धमाका

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये बुधवारपासून वन डे मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले असून पहिला सामना हॅमिल्टन येथे होणार आहे. या लढतीचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदुस्थानसाठी दोन खेळाडू पदार्पण करणार आहेत. पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल हे सलामीवीर उद्याच्या लढतीत वन डे क्रिकेटमधील श्रीगणेशा करतील.

आजची पहिली वन डे लढत – हिंदुस्थान-न्यूझीलंड, हॅमिल्टन, सकाळी 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या