महिलेच्या एफडी खात्यातून 10 लाखांची फसवणूक, तक्रार केल्यानंतर बॅंकेच्य़ा अधिकाऱ्यांच दिली धमकी

एका स्थानिक बॅंकेच्या एफडी अकाऊंटमधून लाखो रुपयांचा फ्रॉड समोर आला आहे. कहर म्हणजे महिलेने ज्यावेळी बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली त्यावेळी अधिकाऱ्यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून फसविण्याची धमकी दिली.

हे प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी खासगी बँकेच्या अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण एका खासगी बँकेच्या कर्मचार्‍यांनी महिलेच्या एफडी खात्यातून 10 लाख रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात आहे. दिल्ली पोलीस खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या तक्रारीवरुन, दिल्ली पोलिसांनी बँकेच्या मुंबई मुख्य कार्यालयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि बँकेच्या अध्यक्ष आणि दिल्ली शाखेच्या व्यवस्थापकाची नावे दिली. या प्रकरणी पीडित महिला दिल्लीतील प्रीत विहार येथे राहणारी एका खासगी कंपनीत काम करते. त्यांनी सांगितले की, त्यांचे बँकेत दहा वर्षाहून अधिक काळ बचत खाते आहे. मी माझ्या मुलीसाठी आणि तिच्या शिक्षणासाठी पैसे खात्यात जमा करत होते. 29 सप्टेंबर 2016 रोजी 5.98 लाख रुपये शिल्लक होते. त्यानंतर बॅंकेने मला जिथे आधी मी राहत होते तिथल्या बॅंकेत एफडी खाते उघडण्याचा आणि त्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला. प्रीत विहार शाखेतील एका बँक अधिकाऱ्याने मला वेगवेगळ्या गुंतवणूक योजना बनवण्याबाबत माहिती दिली.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, गर्ल चाईल्ड प्लान अंतर्गत वर्षाला 5 लाखांची गुंतवणूक करण्यासाठी सहमती दाखवली. पोलिसांच्या माहितीनुसार, पहिला हप्ता 2016 मध्ये, दुसरा 2017 मध्ये कापला गेला होता. त्यानंतर बॅंकेतून तिसरा हप्ता गोळा करण्याबाबत फोन आला. मध्येच तिसऱ्या हफ्त्यासाठी फोन आल्याने महिलेला थोडा संशय आला. ती खातरजमा करण्यासाठी बॅंकेत गेली. त्यावेळी त्यांनी सांगितले असे फोन मुख्यालयाच्या सेंटरमधून केले जातात जे आऊटसोर्स केले जातात. पण तिसऱ्या हफ्त्याबाबत जो फोन आला तो फोन चूकून आल्याचे त्यांनी सांगितले.  त्यानंतर तिसऱ्या हफ्त्यासाठी एक चेक दिला. त्यानंतर बॅंक अधिकारी आणि प्रबंधकाने सांगितले की, पैसे दुसऱ्या बॅंकेत ट्रान्सफर झाले आहेत. पण ज्यावेळी महिलेने मॅनेजरसोबत बोलण्याबाबत सांगितले त्यावेळी बॅंकेतील अधिकाऱ्यांनी आयकर अधिकाऱ्यांना बोलावून खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने ग्राहक न्यायालयात जाऊन पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले, त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. सध्या बँक व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.