ट्रेंड – एबीसीडी… महिना 21 हजार!

नर्सरीची फी तब्बल अडीच लाख रुपये. काय विश्वास बसत नाही ना. हैदराबाद येथील एका खासगी शाळेत आकारल्या जाणाऱ्या फी संबंधित एक कागद सध्या व्हायरल होत आहे. तो बघून अनेकांनी कपाळावर हात मारलाय. यामध्ये नर्सरीची वार्षिक फी 2,51,000 रुपये असल्याचे दिसून येत आहे. अनुराधा तिवीर यांनी सोशल एक्स प्लॅटफॉर्मवर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता एबीसीडी शिकण्यासाठी तुम्हाला दरमहा 21 हजार रुपये खर्च येईल. इतक्या जास्त फीला न्याय देण्यासाठी या शाळा असे काय शिकवत आहेत,’ असे त्यांनी पॅप्शनमध्ये लिहिले आहे. यामुळे हिंदुस्थानात मध्यम वर्गातील एखाद्या कुटुंबाला त्यांच्या मुलांना हे शिक्षण देणे परवडू शकते का? अशी चर्चा यानिमित्ताने सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अनेक जण एवढय़ा जास्त फीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.