गुगल सर्च 2018; ‘प्रिया वारियर’ नेटकऱ्यांच्या पहिल्या पसंतीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रियंका, दीपिका, अनुष्का, आलिया या स्टार अभिनेत्रींना मागे टाकत मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियर नेटकऱयांच्या पहिल्या पसंतीची ठरली आहे. 2018 या वर्षात हिंदुस्थानात प्रियाला गुगल सर्चवर सर्वाधिक सर्च केले गेले. सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर प्रिया एका रात्रीत स्टार झाली. तर दुसरा क्रमांक अमेरिकन गायक आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याने पटकावला आहे. प्रियाने मल्याळम चित्रपट ‘ओरू अड्डार लव्ह’मध्ये काम केले होते. या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला होता.

गुगल सर्चवरील ‘टॉप 10’ सर्च
प्रिया वारियर, निक जोनस, सपना चौधरी, प्रियांका चोप्रा, सोनम कपूरचे पती आनंद आहुजा, सारा अली खान, सलमान खान, अमेरिकन कलाकार मेगन मॉर्केल, भजन गायक अनुप जलोटा, बोनी कपूर.