
राज्यात एकीकडे कोरोनावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्स पंपनीमध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दरदिवशी 30 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाइफ सायन्सला उसणवार तत्त्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे. राज्यात जाणवत असलेला रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिवीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.


























































