
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा शनिवारी रत्नागिरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जयस्तंभ येथे ज़ाहिर निषेध करण्यात आला.
भ्याड हल्ला करण्यास प्रवृत्त करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बशीर मुर्तुझा,तालुकाध्यक्ष राजन सुर्वे,शहराध्यक्ष निलेश भोसले.बंटी वणजू व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.






























































