माढामध्ये किरीट सोमय्यांचा निषेध; जोडे मारो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने भाजप नेता खासदार किरीट सोमय्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. माढा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ गायकवाड, माढा तालुका प्रमुख मधुकर (आण्णा) देशमुख, महिला आघाडी जिल्हा संघटिका आशाताई टोणपे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी सचिन बागल, युवतीसेना जिल्हा युवती अधिकारी साक्षी भिसे, तालुका समन्वयक गोरख ताकमोगे, उपतालुका प्रमुख माणिक श्रीरामे, सतिश क्षीरसागर, कुर्डूवाडी माजी नगराध्यक्षा शुभांगी श्रीरामे,संगिता भोसले, माजी ता.पं.समिती सदस्य बापूसाहेब जाधव भारत कापरे, कुर्डूवाडी शहरप्रमुख कुमार (काका) गव्हाणे,शिवअरोग्य सेना जिल्हा समन्वयक दिपक (आबा) सुर्वे,ग्राहक संरक्षण कक्षाचे धनंजय चोपडे, टेंभुर्णी शहरप्रमुख सुरेश (भाऊ) लोंढे ,मोडनिंब शहरप्रमुख संदेश तोडकरी,सुरेश दादा भांगे,बाळासाहेब भांगे, गौतम शिंदे, विभाग प्रमुख सोमनाथ लांडे, राजेंद्र शिंदे, गटप्रमुख राहुल यादव,युवासेना कुर्डूवाडीचे स्वप्निल गवळी,उपतालुका युवा अधिकारी शंभू फुगे,टेंभुर्णी उपशहर प्रमुख संतोष खैरमोडे, नितिन भांगे, जितेंद्र जमदाडे,दिपाली शिंदे, कोठावळे, नितिन शिंदे यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी युवतीसेना आजी माजी पदाधिकारी आणी शिवसैनिक उपस्थित होते.