बंजारा समाजाबद्दल अवमानकारक उद्गार, मल्लिकार्जून खरगेंचा जोरदार निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

बंजारा समाजाबद्दल अपमानास्पद उद्गार काढल्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांचा तमाम बंजारा समाजामध्ये निषेध सुरू आहे. नांदेड येथे नाईक चौकात बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खरगेंविरोधात पोस्टर झळकावत तीव्र निषेध नोंदवला.

nanded-mallikarjun

मल्लिाकर्जून खरगे हे उद्या नांदेडच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी त्यांना नांदेडमध्ये काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार राष्ट्रीय बंजारा परिषदेने केला असून, त्यांच्या उद्याच्या सभेतही बंजारा कार्यकर्ते निषेध करतील, असे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मोहन चव्हाण यांनी सांगितले. याशिवाय मोहन चव्हाण यांनी मल्लिाकर्जून खरगे यांच्यावर बंजारा समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन पोलीस अधिक्षकांना दिले आहे. या निवेदनावर प्रकाश राठोड, प्रा.एन.जी.राठोड, गुलाब राठोड, अशोक राठोड, संजय जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.