वाटद एमआयडीसी विरोधात चाकरमानी मुंबईत करणार आंदोलन

वाटद येथील एमआयडीसीच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमानीही एकवटले आहेत. जो पर्यंत एमआयडीसीची अधिसूचना रद्द होत नाही तो पर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार चाकरमान्यांनी केला आहे. वाटद एमआयडीसीच्या विरोधात पुढील आठवड्यात दादर येथे हजारोंच्या निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी मानवाधिकार विश्लेषक ॲड. असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.

दादर येथील पर्ल सेंटर मध्ये वाटद पंचक्रोशीतील चाकरमान्यांची बैठक झाली.याबैठकीत चाकरमान्यांनी वाटद एमआयडीसीला तीव्र विरोध केला.आमच्या जमिनी बळाकावून विकास नको.त्यापेक्षा शेती आणि पर्यटनावर आधारित प्रकल्प आणावेत आम्ही सहकार्य करू अशी भूमिका चाकरमान्यांनी मांडली.वाटद एमआयडीसी संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गवाणकर यांनी सांगितले की,वाटद एमआयडीसीला फक्त स्थानिकांचा विरोध नाही.संपूर्ण कोकणासह मुंबईतून विरोध होत आहे.पुढील काही दिवसात आंदोलनाला वेग आणि व्यापक स्वरूप देणार आहोत असे गवाणकर म्हणाले.