धनगर आरक्षणासाठी चौंडीत उपोषण

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू असताना आता धनगर आरक्षणाचाही प्रश्नही पेटला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने आजपासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. ‘संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकूम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही,’ असा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष, राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत दोडतले यांनी या आंदोलनातही फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.