
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन करणार्या दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांकर झालेल्या लाठी हल्ल्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अनिकेत कॅण्टीनजकळ आंदोलन केले.
दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला किरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांकर लाठीहल्ला केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या लाठीहल्ल्याचा सावित्रीर्बाइ फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. अनिकेत कॅण्टीनजकळ विद्यार्थ्यांनी सरकारकिरोधात घोषणा दिल्या. याकेळी सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी होते.
यामधील आंदोलक विद्यार्थी सतीश गोर्हे म्हणाला, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा किरोध करत आहोत. विद्यार्थ्यांकर लाठीहल्ला करून हा किषय सरकार किरुद्ध विद्यार्थी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही तो होऊ देणार नाही. आज देशभरात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थी देखील हजर होते. 18 तारखेला विद्यार्थ्यांकडून विद्यापीठात मशाल रॅली देखील काढण्यात येणार आहे.


























































