
राज्यातील सर्व शाळांच्या फीविषयी माहिती सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी व्यवस्थापनांच्या तसेच विविध शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये खुला, ईबीसी, मागसवर्गीय, ओबीसी प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या फीविषयी माहिती देण्याचे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 13 हजार शाळांतील 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या फीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे उपलब्ध होणार आहे.





























































