
घरात काम करणारी भांडीवाली, साफसफाई करणारी बाई, पोळय़ा करणारी बाई यांच्यासह ड्रायव्हरलाही आता पीएफ देण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्र सरकारने आता स्वयंरोजगार करणाऱ्यांनाही पीएफचा लाभ देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पीएफ कायद्यात बदल करण्यात येणार असून तसा प्रस्ताव लवकरच मांडण्यात येणार आहे.


























































