
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
आर्ट सर्कल रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने उद्या दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळ सहा वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पुलोत्सवाला शुभारंभ होणार आहे. उद्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहावाजता पुलोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी सुप्रिया चित्राव संवाद साधणार आहे. त्यानंतर अपरिचित पु.ल. हा कार्यक्रम अभिनेते गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत काळे आणि सतीश आळेकर सादर करणार आहेत.
दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता व्यंगचित्रकार चारूहास पंडीत यांची मुलाखत आणि व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.रात्री साडेनऊ वाजता पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सचिन जोशी यांनी केले आहे. ‘एक झुंज वाऱ्याशी’ मध्ये राजेश देशमुख, सुनील अभ्यंकर, मंजिरी साने, डॉ. विवेक बेळे हे कलाकार आहेत. पुलोत्सवात पु. ल. वरील लघुपट दाखविण्यात येणार आहेत, यंदाचा पुलोत्सव तरूणाई पुरस्कार गायिका आणि अभिनेत्री प्रियांका बर्वे यांना जाहिर करण्यात आला आहे. गायिका, अभिनेत्री प्रियांका बर्वे यांना दि. 9 रोजी तो प्रदान करण्यात येणार आहे.































































