एनआयएतर्फे साडेतेरा हजार पानांची चार्जशीट; पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी नॅशनल इन्केस्टिगेशन एजेंसीतर्फे (एनआयए) मंगळवारी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. तब्बल 13 हजार 500 पानांची ही चार्जशीट असून याप्रकरणी एनआयएने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्यासह एकूण 19 जणांना आरोपी घोषित केले आहे. मसूदसह त्याचा नातेवाईक अम्मर अल्की, अब्दुल अगसर याच्यासह या हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादी मोहम्मद फारुख, सुसाईड बॉम्बर आदिल अहमद डार आणि पाकिस्तानातून चालविण्यात येणाऱ्या दहशतवादी संघटनेच्या अनेकांच्या नावांचा समावेश आहे.

14 फेब्रवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानाचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा तपास नॅशनल इन्केस्टिगेशन एजेंसीकडे सोपविण्यात आला होता. अखेर याप्रकरणी एनआयएने आज चार्जशीट दाखल केली आहे. तब्बल 13 हजार 500 पानांच्या या चार्जशीटमध्ये दहशतवाद्यांविरोधात भक्कम पुराव्यांचा उल्लेख केला आहे. चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या या पुराव्यांमध्ये दहशतवाद्यांचे फोनवर झालेले संभाषण, कॉल डिटेल्स यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.

एनआयएकडून काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीर येथून 25 वर्षीय मोहम्मद इक्बाल राथेड याला अटक केली होती. त्याच्यावर या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख मोहम्मद उमर फारुक याला मदत केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. याचाही उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. त्याशिवाय अटकेत असलेले मोहम्मद अब्बास राथर, कैज-उल- इस्लाम, तारिक अहमद शाह आणि त्याची मुलगी इंशा जान यांच्यावर देखील या चार्जशीटमध्ये ठपका ठेवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या