Pulwama Attack सोनू भडकला, ‘फेक्युलर’ मंडळींना ट्विटरवरून झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पुलवामा येथे जवानांवर झालेल्या महाभयंकर हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. सोशल मीडियावरून अनेक जण त्यांचा राग व्यक्त करत आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम याने देखील त्याचा राग व्यक्त केला असून त्याने ढोंगी सेक्युलर लोकांना म्हणजेच ‘फेक्युलर’ मंडळींना ट्विटरवरून झोडपून काढलं आहे. सोनू निगमने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याद्वारे त्याने संताप व्यक्त केला आहे.

‘देशात सध्या खूप कल्लोळ माजलाय, सर्वजण दुख व्यक्त करत आहेत. पुलवामात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. 44 असो किंवा 440 शहीद झालेले असो तुम्ही का एवढे दुख करत आहात? तुम्ही तर ते करा जे या देशात जे सेक्युलर लोकं करतात. तेच इथे योग्य ठरवलं जातं. या हल्ल्यावर दुख करण्यासाठी हिंदुत्त्वावादी संघटना, राष्ट्रवादी संघटना, भाजप, आरएसएस आहेत. तुम्ही सर्वांनी ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल झिंदा है’ या घोषणा द्या. जर हिंदुस्थानात राहायचे आहे तर अशा घोषणा देणाऱ्यांसारखेच तुमचेही विचार असायला हवेत. इथे वंदे मातरम वगैरे बोलणं चुकीचं आहे.’ असा उपरोधिक टोला त्याने या व्हिडीओतून लगावला आहे.