
जमीन लाटण्यासह फसवणूकप्रकरणी ‘मोक्का’च्या गुह्यातील फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱहाटे याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. तब्बल 17 गुह्यांत मागील एक वर्षापासून गुंगारा देणाऱया बऱहाटेला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटेकचा नि:श्वास सोडला आहे. त्याला पकडण्यासाठी विविध पथकांकडून दिवसरात्र काम करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियाद्वारे ऑक्टिव्ह झाल्यानंतर बऱहाटेला वेसण घालणे पोलिसांना शक्य झाले.
शहरातील अनेक नागरिकांची फसवणूक करून त्यांची जमीन बळकाविणे, धमकी देऊन प्रॉपर्टी स्वत:सह टोळीच्या नावावर करून घेणे, धमक्यांना भीक न घालणाऱयांना थेट गोळ्या घालण्याचा इशारा देणे, बदनामी करणे यांसह संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रवींद्र बऱहाटे याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांकडून टास्क फोर्स प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे सोशल मीडिया हॅण्डल करणारे लोक, फोनवर संपर्क साधणारे, त्याशिवाय बऱहाटेने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडीओ वारंवार पाहून लाइक्स करणाऱयांची कुंडली तपासण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्याच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानुसार आज त्याला अटक करण्यात आली आहे.



























































