राजगुरूनगरच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला 9 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

369

अनुदान मंजूर करण्यासाठी 9 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या राजगुरूनगर तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर राऊत असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी ठिबक सिंचन-तुषार सिंचनासाठी शासनाकडून येणाऱ्या अनुदानासाठी 18 फाईल राजगुरूनगर कृषी कार्यालयात दिल्या होत्या. या फाईलच्या प्रकरणाचे अनुदान मंजूर करण्यासाठी  विठ्ठल राऊत यानी 9 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारादर यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यामध्ये राऊत यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार  बुधवारी सायंकाळी राऊत यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या