
मुंबई येथे मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात सोडून परत येत असताना पुणे-नगर मार्गावरील सूप्याजवळ इको स्पोर्ट गाडीला कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात संभाजीनगर येथील दोन शिक्षकांचा दुर्दैवी म़त्यू झाला. हा अपघात शुक़वारी रात्री घडला. मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला सोडून घरी परतत असताना हा काळाने घाला घातला.
सुपा-नगर दरम्यान संभाजीनगरला परत येत असताना कुंभेफळ जवळील लाडसावंगी केंद्रात कार्यरत शिक्षक संजय लेंडाळ यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात लेंडाळ व जिवलग मित्र शिक्षक चंद्रशेखर ठाकूर हे दोघे ठार झाले. लेंडाळ हे शिक्षिका निता कर्डीले यांचे पती होते. विशेष म्हणजे सध्या दोघेही एकाच शाळेत कार्यरत होत. चंद्रशेखर ठाकूर हे फुलंब्री प्रशालेच्या वंदना ठाकूर यांचे हे पती होते. तर प्रविण गायकवाड सर यांचे मेव्हणे होते. अपघातात दोन्ही मित्र शिक्षकांचे दुःखद निधन झाले आहे.
पुणे-नगर- संभाजीनगर महामार्गावर सुपा पासून दहा किलोमीटर पुढे नगरला जाताना गाडीला अपघात झाला. लेंडाळ यांचा अत्यंविधी त्यांचा मूळ गावी सोनेरी, शेवगाव येथे होणार आहे. ठाकूर यांचा अंत्यविधी संभाजीनगर येथे होणार आहे.

























































