
तालुक्यातील कोळपेवाडी येथे 4 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत बाबीर बाबाची यात्रेवेळी पशुहत्या थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. बाबीर बाबाच्या यात्रेत नवस फेडण्याकरिता 250 ते 300 बोकडांचा बळी देतात.
तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यावर र्निबध आहेत.
याबाबत माहिती देताना तहसीलदार चंद्रे म्हणाले , माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी पीपल फॉर एनिमल्स या संस्थेमार्फत पशु अधिकार बाबत काम करीत असून या संस्थेमार्फत कोळपेवाडी येथील बाजीर बाबा यात्रेमध्ये पशुहत्या होत असल्याचे माहिती मिळाली सदर माहिती त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना कळविले. तहसीलदार कोपरगाव म्हणून मला आदेश दिले त्यांच्या आदेशानुसार कोळपेवाडी येथील 4 व 5 रोजी होणाऱ्या बाबीर बाबा यात्रेत पशुहत्या थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून 144 कलम लागू करण्यात आला आहे कोळपेवाडी येथे बाबीर बाबा यांचे छोटेसे मंदिर असून या ठिकाणची कमिटी कायदेशीर नाही राज्यभरातून लोक आपले नवस फेडण्यासाठी येथे येत असतात परंतु निर्बंध केल्यामुळे आज कुठल्याही प्रकारची यात्रा भरली नाही किंवा पशु हत्या झाली नाही रॅपिड अकॅशन फोर्स सह उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांत, तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी तळ ठोकून ठेवल्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते
































































