दिवंगत आमदार विनायक मेटे यांचा फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न, बहीण आणि भाच्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांचा विमान नगर येथील फ्लॅट सख्खी बहीण आणि भाच्याने बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मेटे यांचा मुलगा आशुतोष विनायक मेटे (20, रा. कोरेगाव पार्क) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेटे यांची बहीण आणि भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नगर येथील गंगापूर हौसिंग सोसायटीमध्ये मेटे यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या ठाणे येथील बहिणीने आणि भाच्याने फ्लॅटचे लॅच तोडून फ्लॅट ताब्यात घेतला. ही सदनिका मेटे यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांचा मुलगा शिक्षणानिमित्त कोरेगाव पार्क येथे राहतो. याबाबत मुलगा आशुतोष याने दिलेल्या फिर्यादीवरून बहीण आणि भाचा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.