Photo – पुण्याच्या ‘बीबी रेसिंग’ने पहिली फेरी गाजवली

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या सीझन 2 ची सुरुवात पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे थरारक वातावरणात झाली. होम टीम बीबी रेसिंगने आज विजेता म्हणून बाजी मारली. लीगच्या उद्घाटन फेरीत अखंड रोमांच, जबरदस्त वेग आणि थरारक स्पर्धा अनुभवायला मिळाली. हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये हिंदुस्थानी आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सन झुंजताना दिसले. या स्पर्धेची दुसरी फेरी 6 आणि 7 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रंगणार आहे. तर, अंतिम सामना 20 आणि 21 डिसेंबर रोजी कोझिकोड (केरळ) येथे पार पडणार आहे.

सर्व फोटो – चंद्रकांत पालकर