पुणे – दुचाकी घसरून झालेल्या अपघात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी करून घरी चाललेल्या दुचाकीस्वार महिलेचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेला किरकोळ दुखापत झाली. अनिता मंगेश विधाते (वय 31, रा. काळूबाईनगर, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार सागर दळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी अनिता आणि त्यांची आई संगीता पांडुरंग जाधव (वय 52) नगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. रात्री पावणेआठच्या सुमारास दुचाकीस्वार अनिता आणि त्यांची आई संगीता वाघोलीकडे निघाल्या होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात त्यांची दुचाकी घसरल्यामुळे खाली पडून अनिता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरूवारी (9 सप्टेंबर) त्यांचा ससून रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.