
भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात काल बालेवाडीतील पुलावर घडला. शुभम विनोद गुप्ता (वय 27, रा. नियती एम्पायर, म्हाळुंगे) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत विकास गुप्ता (वय 41, रा. धानोरी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार गुप्ता यांचा चुलतभाऊ शुभम सोमवारी (5 एप्रिल) सकाळी साडेआठच्या सुमारास औंध-बालेवाडी रस्त्याने दुचाकीवर चालला होता. त्यावेळी धनकुडे फार्मजवळील पुलावर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार शुभमला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या शुभमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे तपास करत आहेत.



























































