दुचाकीस्वाराला खाली पाडून मोबाईल हिसकावला, गुन्हा दाखल

दुचाकीस्वाराला लाथ मारून खाली पाडत चोरट्याने मोबाईल हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी पावणे दोनच्या सुमारास जहांगीर रुग्णालयाच्या पार्किंग गेटच्या पुढे घडली. याप्रकरणी दिपक नारायण फुलकर (वय 43,रा. शुक्रवारपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारसायकलवरील चोरांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुचाकीवरून ससून रस्त्याने जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी दीपकच्या दुचाकीला जोरात लाथ मारली. दीपक खाली पडल्यावर चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 10 हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. शहरात मागील काही दिवसापासून चोरट्यांकडून चोरीचा सपाटा लावला असल्याचे दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या