
भाजी खरेदी करून मैत्रिणीसोबत पायी रस्त्याने घरी परतत असताना एका जेष्ठ महिकेच्या गळ्यातील 39 हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वारजेतील स्पंदन इमारती समोर घडली.
याप्रकरणी केतकी चौधरी (वय – 62) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
केतकी या काल रात्री सातच्या सुमारास भाजी खरेदी करून मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी घरी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने केतकीच्या गळ्यातील 39 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस तपास करीत आहेत.





























































