पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’मुळे गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या 18 वर

1291

देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. महाराष्ट्रमध्येही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरात कोरोनाचा आकडा सर्वात जास्त आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढतो आहे. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 8 बळी गेले असून एकूण मृतांची संख्या 16 झाली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडा हजार पार गेला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. निम्म्याच्या वर संख्या मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची आहे. त्यानंतर पुण्यात कोरोनारुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाले आहेत.

पुण्यात बुधवारी ससून रुग्णालयातील 3 जणांचा तर नायडू आणि नोबेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात दुपारनंतर 3 मृत्यूंची भर पडली. एकट्या पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच काही भाग सील करण्यात आला आहे.

राज्यात 1135 कोरोना पॉझिटिव्ह
देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार पार पोहोचली असताना महाराष्ट्रातील सर्वाधिक 1135 रुग्ण आहेत. बुधवारी 117 रुग्ण आढळले आणि 8 जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या