
कोरोनामुळे वर्षभरात दोन्ही कत्र्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर शेख कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, वर्दीतली एका अधिकाऱ्याने माणुसकी जपत कुटूंबियांची मदत करीत मोठा आधार दिला आहे. दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या मोहमंद शेख यांच्या कुटूंबियासाठी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी ईद साजरी करताना मुलाची भूमिका निभावली आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शांतता कमिटीचे सदस्य मोहमंद शेख यांच्या 37 वर्षाच्या मुलाची तब्येत बिघाडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. तो पॉझिटीव्ह निघाल्यावर कुटूंबातील 14 जणांना क्वारंटाईन केले. त्यावेळी मुलाच्या उपचारासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यानी प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यन मोहमंद शेख यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यावेळी शेख कुटूंबियातील नातलगाप्रमाणे घेवारे यांनी मुस्लिम समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे मुलावर अत्यंसंस्कार केले. दरम्यान, कोरोनामुळे 14 एप्रिलला दुसऱ्या मुलाचेही निधन झाल्यामुळे शेख कुटूंबियांचा आधार हरविला होता. अशा परिस्थितीत ईद साजरी करण्यासाठी घेवारे यांनी शेख कुटूंबियांचे घर गाठून साहित्य देत माणुसकी जपली आहे.
”कोरोनामुळे दोन्ही कत्र्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर वर्दीतील पोलिस अधिकारी देवीदास घेवारे यांनी मुलाप्रमाणे आमच्या कुटूंबियांना मानसिक आधार दिला आहे. त्याशिवाय परिसरातील गरिबांना किराणा मालाचा पुरवठा करणे, झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांची मदतीची भूमिका कायम असते.” – मोहमंद अली शेख, शांतता कमिटी सदस्य



























































