Pune crime news – म्हाडा घराचे आमिष दाखवून 74 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाचे रो-हाऊस मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका दाम्पत्याला भामट्याने तब्बल 74 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना पिंपरी परिसरातील संत तुकाराम नगर येथे मार्च महिन्यात घडली. आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पीडित महिलेने तिघांविरोधात पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करून संत तुकारामनगर येथील म्हाडाचे रो-हाऊस खरेदी करून देतो असे फिर्यादी व त्यांच्या पतीला सांगितले. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 74 लाख 20 हजार रुपये घेतले व घर न देता फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.