बोपदेव घाटात टोळक्याने तरूणाला लुटले, दरोड्याचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

 

बोपदेव घाट परिसरात रात्री दहाच्या सुमारास थांबलेल्या तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लुटल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी तरुणाकडील दोन मोबाईल आणि नऊ हजार रूपये असा 34 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत गंगाधाम परिसरात 21 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार 18 ते 24 वयोगटातील सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुण 25 मार्चला रात्री दहाच्या सुमारास बोपदेव घाटत थांबला होता. त्यावेळी सहा जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून तरुणाला हाताने मारहाण केली. तरुणाकडे असलेले दोन मोबाईल आणि रोख नऊ हजार रूपये त्यांच्याकडून जबरदस्तीने घतले. त्यानंतर निघून गेले. यानंतर तरुण घाबरला होता. त्यामुळे त्यांनी तक्रार केली नव्हती. तरुण गावाहून आल्यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.