
रस्त्याने जाताना एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना 20 एप्रिलला रात्री सव्वा नऊच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील मिळून चौघांना अटक करण्यात आली आहे .
हर्षल विठ्ठल शेलार (वय – 32), पवन विठ्ठल शेलार (वय – 32, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय जंगम (वय – 23, रा. मंगळवार पेठ ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून अक्षय यांच्यासह शुभम झोळ याची हर्षल आणि विठ्ठल यांच्यात वादावादी झाली. त्याच रागातून आरोपींनी अक्षयला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर शुभम झोळ यालाही ढकलून देत जखमी केले. हातातील कोयते हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करीत आहेत.
रस्त्याने जाताना एकमेकांकडे बघितल्या रागातून आरोपी शुभम आणि अक्षयने फिर्यादी हर्षल शेलार यांच्यासह वडिल आणि भावाला कोयत्याने मारहाण केली आहे. याप्रकरणी शुभम झोळ आणि अक्षय जंगम यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत.





























































