
कचरा वेचकाचा गोळ्या झाडून खुन केल्याचा प्रकार खराडी परिसरात घडल्यानंतर गुन्हेशाखेच्या युनिट चारने दोघांना सोलापूर येथून बेड्या ठोकल्या आहे. मुख्य आरोपीच्या प्रेमसंबधात अडसर ठरत असल्यानेच हा खुन केल्याचे उघडकीस आले आहे.
मुख्य आरोपी संतोष सत्यवान शिंदे (वय 28 बिदर, राज्य कर्नाटक, मुळ पत्ता मु. पो. कान्हापुरी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) आणि संग्राम उर्फ बाबु राजु बामणे (रा. मु. पो. कान्हापुरी, मारुती मंदीरासमोर, ता. पंढरपुर जि. सोलापुर) अशी अटक केलेल्यची नावे आहेत. अक्षय प्रकाश भिसे (वय 26, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी संतोष सोने वितळविण्याच्या कारखान्यात कामाला होता. तर बामणे हा टेंभुर्णीतील हॉटेलमध्ये मॅनेजरचे काम करत होता. अक्षय भिसे यांचा 21 ऑगस्ट रोजी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून खून केला. पथकाने सिसिटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटिव्ही फुटेज तपासाणारे पथक सोलापूर येथील टेंभुर्णी येथे संशयीत आरोपींचा माग काढत पोहचले. खून झालेल्या अक्षयच्या संपर्कात संतोष शिंदे संपर्कात होता. तो अक्षयच्या नातेवाईकांकडून पोलिसांच्या हालचालीची माहिती घेत होता. गुन्हा केल्यानंतर तो गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घेऊन त्याचा मित्र संग्राम बामणे असलेल्या सागर लॉजवर आला होता. ते घटनेच्या रात्री दुचाकीवर पुण्याच्या दिशेने गेले होते. त्याचाच माग काढत युनिट चारने दोघांना सोलापूर येथून बेड्या ठोकल्या. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, एपीआय विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील,महेंद्र पवार, राजस शेख, हरिष मोरे, प्रविण भालचिम, सारस साळवी, अशोक शेलार यांनी केली.
पायातील बुटावरून गुन्हा उघड
आरोपीच्या हेल्मेटवरील एक चिन्ह आणि पायातील बुट यावरून पथक सोलापूर येथे पोहचले. आरोपींनी दुचाकीवर प्रवास करताना खुन करताना परिधान केलेले कपडे बदलले. तसेच येताना जाताना कोणी ओळखू नये म्हणून वेशांतर केले होते. प्रेमसंबधातील अडसर दुर करण्याचा प्लॅन आरोपींचा मागील तीन महिन्यांपासून सुरू होता. या घटनेला पुर्णरूप देण्यासाठी त्यांनी कर्नाटकातील हुम्नाबाद येथून दुचाकी देखील चोरली. त्याच दुचाकीवर त्यांनी सोलापूर ते पुणे प्रवास करून गुन्हा केला. आरोपी संतोष शिंदेचे अक्षय भिसे नातेवाईकाबरोबर लग्नापूर्वी प्रेमसंबध होते. परंतु, तिचे लग्न झाल्यानंतर अक्षयप्रेमसंबधातील अडसर ठरत होता. तिनेही लग्न झाल्याबरोबर संतोषशी असलेले संबंध तोडले होते. परंतु, हा अडसर दुर केला तर संबधीत महिला आपल्याशिवाय दुसरीकडे कुठे जाईल असा त्याचा समज झाला होता. त्यामुळे अक्षयचा कायमच काटा काढण्यासाठी संतोष याने त्याचा साथीदार बामणे यांच्या मदतीने फ्लॅन तयार करून खुन केला
आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी टीव्ही व मोबाईलवर गुन्हेगारी संबंधातील वेब सिरीज, मालिका तसेच चित्रपट पाहिले होते. त्या आधारेच त्यांनी अक्षला संपविण्याचा प्लॅन केला. त्यासाठी आंध्रप्रदेशात जावून पिस्तुलही खरेदी केले अक्षचा खुन केल्यानंतर संतोषने सग्रामला तो काम करत असलेल्या सागर लॉजवर सोडले. पथकाने गुन्ह्यातील छोट्या-छोट्या गोष्टीचा अभ्यास करून आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली.
– जयंत राजुरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट चार

























































