उशाखाली पैसे घेउन झोपणे पडले महागात, जेष्ठाची एक लाखांची चोरी

उन्हाळ्यात घरात खूपच उकाडा असल्यामुळे जेष्ठाला 1 लाख 5 हजार रूपये उशाखाली ठेउन मोकळ्या जागेत झोपणे महागात पडले आहे. चोरट्यांनी त्यांच्या उशाखाली ठेवलेली रक्कम चोरून नेली. ही घटना दोन दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास कोंढवा खुर्द परिसरातील टिळेकरनगरमध्ये घडली. याप्रकरणी पांडु खटरावत (वय 45, रा. टिळेकरनगर, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडु गवंडी काम करतात. ते कुटूंबियासह येवलेवाडीतील टिळेकरनगरमध्ये राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी त्यांना कामाचे पैसे मिळाले होते. मात्र, घरात खूपच उकाडा असल्यामुळे त्यांनी 1 लाख 5 हजारांची रक्कम उशाखाली ठेउन मोकळ्या जागेत झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या उशाखालील 1 लाख 5 हजारांची रोकड चोरून नेली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रक्कम मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या