वर्षभरापासून फरार असलेल्या सराईताला अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

529

वर्षभरापासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. किरण विठ्ठल शिंदे (वय – 18, रा. नऱ्हेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी अमोल पवार पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मागील वर्षभरापासून फरार असलेला सराईत किरण शिंदे आंबेगावमधील दत्तनगर चौकात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, अमोल पवार, वैभव स्वामी, रिजवान जिनेडी, तुषार खडके, बाबा चव्हाण, अजय थोरात यांच्या पथकाने केली. पो. निरीक्षक गाडे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या