पुणे – सराईताने शिवीगाळ करत पोलिसावर विट भिरकावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील बिबेवाडीतील पाबळवस्ती परिसरात दोन सराईत गुन्हेगार गोंधळ घालत होते. त्यावेळी तेथे पोहोचललेल्या कर्मचाऱ्याला दोघांनी शिवीगाळ करून झटापट करत विट भिरकावली. ही घटना मंगळवारी रात्री दिडच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी अमोल तानाजी ढावरे (वय.20,रा. जांभुळवाडी कात्रज) याला अटक केली आहे. तर सनि संतोष भरगुडे (वय.20,रा. बिबेवाडी) व त्यांचे इतर दोन साथीदार अशा चौघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी अमोल नवले यांनी बिबेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमोल सराईत गुन्हेगार असून मंगळवारी रात्री दिडच्या सुमारास ते गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी नवले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जावून त्यांना विचारणा केली. त्यावेळी सनीने त्यांच्या दिशेने विट भिरकावून फेकली. ढावरे याने देखील झटापट करून शिवीगाळ केली. त्यानुसार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला.