पुण्यात सराईताचा तलवार नाचवित राडा, पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

दुचाकीस्वार थांबला नाही म्हणून दगड फेकून मारत तलवारीने वार केल्याची घटना खडकीत घडली आहे. आरोपीने तलवार नाचवत परिसता दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आकाश उत्तम गायकवाड (वय.29,रा. कमलाई बहिरट चाळ बोपोडी) याला अटक केली आहे. त्याशिवाय सिद्धांत चव्हाण अशा दोघांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघे ही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत शुभम स्वामी (वय.23,रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी स्वामी हे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी आवाज देऊन त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र स्वामी थांबले नाहीत. त्यामुळे त्यांना दगड फेकून मारला. यावेळी आरोपींनी स्वामीवर तलवारीने वार केले. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत त्यांनी तो चुकविला. आरोपींनी गाडीची तोडफोड करून स्वामीला जीवे ठार करण्याच्या हेतूने हातात तलवार व दगड घेऊन पाठला केला. त्यानंतर मोठ्या आरडा-ओरडा करत आम्ही येथील भाई आहोत आमच्या नादी कोणी लागले तर त्यांना पाहून घेऊ अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.