
वारसाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजाराच्या लाचेची मागणी करून 8 हजाराची लाच खासगी व्यक्तीमार्फत घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना लाचलुपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. राजेश उत्तम गायकवाड (वय.40,तलाठी सजा पळसदेव) आणि संग्राम नथु भगत (वय.40) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला वकिल असून त्यांच्या अशिलाच्या वारशाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने 10 हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 8 हजार रुपयात काम करण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची खातरजमा केली असता, गायकवाड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळ रचून लाच घेताना संग्राम भगत याला ताब्यात घेतले. खासगी व्यक्तीमार्फत लाच घेतल्याप्रकरणी गायकवाड यालाही ताब्यात घेतले आहे.






























































