
कोकण रेल्वे मार्गावर आजपासून 31 जानेवारी या कालावधीमध्ये पुणे-एर्नाकुलम आणि एर्नाकुलम-पुणे ही विशेष गाडी चालवण्यात येत आहे. पुणे-एर्नाकुलम (02051) ही गाडी दर बुधवार आणि रविवार अशी चालवण्यात येणार आहे. तर एर्नाकुलम-पुणे (02052) ही गाडी दर शुक्रवार आणि मंगळवारी चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला कणकवली आणि सावंतवाडी स्थानकात थांबा देण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम (02051) ही गाडी सायंकाळी 6.45 वाजता पुण्याहून निघून एर्नाकुलमला दुसऱया दिवशी सायंकाळी 6.50 वाजता पोहोचेल. तर एर्नाकुलम-पुणे ही गाडी एर्नाकुलमहून पहाटे 5.15 वाजता सुटून पुण्याला दुसऱया दिवशी पहाटे 5.50 वाजता पोहोचेल.
पुणे-एर्नाकुलम ही गाडी पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मडगाव, कारवार, पुंदापुरा, उडपी, मंगळुरू या ठिकाणी थांबणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार आहे.




























































