पुण्यात फटाक्यांमुळे 8 दुचाकींसह 4 बीएचके फ्लॅट जळून भस्मसात, 19 ठिकाणी आगीच्या घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी फटाक्यांच्या आताषबाजीने शहरातील विविध 19 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे एकाच ठिकाणी 8 दुचाकी जळाल्या असून औंध परिसरातील एका सोसायटीमध्ये चार बीएचके फ्लॅट जळून भस्मसात झाले. या घटना सोमवारी रात्री घडल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेउन आगीवर नियंत्रण मिळविले

अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध डी.पी. रस्त्यावर टेरेजा सोसायटीत आहे. फटाक्यांमुळे इमारतीत पहिल्या मजल्यावरील चार बीएचके फ्लॅटमध्ये आग लागली. माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या औंध, एरंडवणा, कसबा, कोथरूड, पीएमआरडीएच्या फायर गाड्यांसह वॉटर टँकरच्या सहाय्याने आग पूर्णपणे विझवली. मात्र, धुराचे प्रमाण जास्त असल्याने स्थानिक नागरिक लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिकांना टेरेसवर सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सोसायटीतील रहिवासी व टेरेसवरील रहिवासी सुखरूप असल्याची पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानी दिली. आग फटाक्यांच्यामुळे लागली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती नीलेश महाजन यांनी दिली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या घटना

जनता वसाहत, गल्ली क्रमांक 47, कात्रज आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक गॅलरीमधे आग, बी.टी. कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्हमध्ये सोसायटीत आग (8 दुचाकी पेटल्या), नऱ्हे मानाजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग, विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ झाडाला आग, वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग, सिहंगड रस्ता, शारदा मठाजवळ, श्वेता सोसायटीत नारळाच्या झाडाला आग, गुरुवार पेठ, शितळादेवी चौक जुन्या वाड्यामधे आग, लोहगाव, अंबानगरी, लटेरिया सोसायटीत आग, वडगाव शेरी, टेम्पो चौक झाडाला आग, खडक पोलीस स्टेशन, लाकडी गणपती जवळ गॅलरीमधे आग, औंध, डिपी रस्ता, इंडियन बँकेजवळ, टेरेजा सोसायटी घरामधे आग, सिहंगड रस्ता, संतोष हॉलमागे नारळाच्या झाडाला आग, बालेवाडी, दत्तमंदिरा जवळ एका दुकानामधून धूर, शनिवार पेठ, नाना नानी पार्क येथे कचरयाला आग, भांडारकर इन्स्टीट्युट जवळ बुलेट गाडीला आग, बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामधे आग, खराडी, साईनाथ नगर येथे दुकानाला आग, हडपसर, सातववाडी कचऱ्याला आग लागली होती.