पुण्यातील जिलब्या मारुती चौकात भीषण आग

19

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील मंडई परिसरात वाहनतळाजवळ जिलब्या मारुती चौकात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 6 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग नियंत्रणात आणण्याचे पर्यत्न सुरू आहेत. त्यानंतर आगीचे कारण शोधण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या