पुण्यात गणशोत्सव व्हिजीलन्स स्क्वॉडने ठेवला वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुन्हे शाखेच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्हिजीलन्स स्क्वॉडने दमदार कामगिरी केली आहे. शहरातील मानाच्या गणपती मंडळांसह महत्वाच्या गणेश मंडपात जाउन विशेष तपासणीवर भर दिला होता. विशेषतः ज्वालागृही पदार्थासह घातपाताच्या पार्श्वभूमीवर पथकाने दक्षता बाळगून तीन शिफ्टमध्ये काम केले. प्रत्येक शिफ्टमध्ये साध्या वेशातील कर्मचारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या आजूबाजूच्या परिसराची छानबीन करून सुरक्षिततेचा आढावा घेत होती.

गुन्हे शाखेच्यावतीने गणेशोत्सवात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियुक्त करण्यात आलेल्या व्हिजीलन्स स्क्वॉडमध्ये 20 कर्मचारी तैनात होते. संंबंधित कर्मचाNयांकडून दररोज तीन शिफ्टमध्ये काम केले जात होते. त्यानुसार मानाचे गणपती आणि महत्वाचे गणेश मंडळांच्या परिसरात तपासणी करण्यावर भर दिला जात होता. घातपातविरोधी कारवायांसह दहशतवाद विरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पथकाकडून खबरदारी घेण्यात आली होती. गणेशोत्सव मंडपालगत असलेल्या आजूबाजूची पाहणी करणे, संशयास्पद वस्तूंची तपासणी करणे, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासोबत सातत्याने संवाद ठेवणे, मॉकड्रीलमध्ये दोन डमी बॅग शोधून काढणे, अशारितीने विविध टास्कद्वारे पथकाकडून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले होते.

 गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेच्यावतीने व्हिजीलन्स स्क्वॉडची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार २० जणांच्या पथकाने उत्सवात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत सुरक्षिततेची काळजी घेतली. सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी बाप्पांचे आगमनापासून विसर्जनापर्यंत चांगली कामगिरी केली. – श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा