
धारदार हत्यारांसह पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी, मिरची पावडर असा, कोयते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महेश बबन गजेसिंह (28), रितेश आबा खरात (27), माधव नारायण अंकुशे (22), महेंद्र नानासाहेब पाटील (24) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील गजेसिंह हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान उंड्रीकडे जाणार्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत सहा ते सात जण उभे असून ते पिसोळी येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मिरची पूड, कोयते असा मुद्देमाल आढळून आला. त्यानूसार पथकाने चौघांना अटक केली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार निलेश देसाई, सतीश चव्हाण, गोरखनाथ चिनके, ज्योतीबा पवार, लक्ष्मण होळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































