किरकोळ वादातून तरूणावर वार करून खूनी हल्ला करणाऱ्या दोघा सराईतांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 23 मे ला मध्यरात्रीच्या सुमारास गुलटेकडीतील डायसप्लॉटजवळ घडली. चिक्कू उर्फ इस्तऱ्या खिलारे (19) आणि सागर मावस (20, रा. गुलटेकडी ) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.
ऋषीकेश दिनेश खिलारे असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून दीनेश अशोक खिलारे (वय 42, रा. गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ऋषीकेश मित्रांसोबत शतपावली करीत होता. त्यावेळी तेथे आलेल्या सराईत चिक्कू आणि सागरने ऋषीकेशला शुभम वायदंडे कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी ऋषीकेशला शिवीगाळ करून शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.





























































